Sunday, December 31, 2006

बरसण

श्रावणातल्या सरी सारखं

तुझे बरसण मला आवडत

कारण त्यानंतर दिसणारे इंद्र्धनुष्य

बघायलाच मी जगत असतो.....

------------योगेश

रोज (रंग माझा वेगळा)

रोज (रंग माझा वेगळा)
गाञागाञाला फुटल्या
तुज्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षञे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!

--i dont know who's this .. but i like this kavita

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

----------Suresh Bhat (गझल सम्राट)


one of my Favourite.........

See also

Blog Widget by LinkWithin